Home देश जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; १८ जण पहिल्या क्रमांकावर

जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; १८ जण पहिल्या क्रमांकावर

0

नवी दिल्ली | भ्रमर वृत्तसेवा : जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर (JEE Main 2021 result announced) करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना नंबर 1 रँक मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट (Atharva Abhijeet Tambat) या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. यासोबतच jeemain.nta.nic.in   या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. निकालासोबतच विद्यार्थ्यांना answer key देखील वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. निकालाबाबत शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली.

एनटीएने २६, २७, ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. ७.८ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिली होती. एनटीएने भारतातील ३३४ शहरे आणि ६००पेक्षा जास्त केंद्रांवर जेईई मेनची परीक्षा घेतली होती. जेईई मेन निकालामुळे जेईई मेन qualifying cutoff स्पष्ट होईल. जेईई मेन परीक्षा विविध टप्प्यामध्ये घेण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेतील रँक NITs, IIITs आणि CFTI मधील प्रवेशासाठी आणि इतर इंजिनियर कॉलेजच्या प्रवेशासाठी वापरला जाईल.

असा बघता येईल जेईई मेनचा निकाल

अधिकृत वेबसाइट nta.ac.injeemain.nta.nic.in वर भेट द्या.

निकालाच्या लिंकवर Link क्लिक करा.

अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा आणि त्यानंतर लॉगिन करा.

JEE Advanced साठी रजिस्ट्रेशन

जेईई मेन २०२१ चा निकाल घोषित झाल्यानंतर जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी (JEE Advanced 2021) रजिस्ट्रेशन सुरु होईल. जेईई मेन कट ऑफमध्ये टॉप रँक मिळवणारे अडीच लाख उमेदवार जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करु शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर जाऊन जेईई अ‍ॅडव्हान्स २०२१ साठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करु शकतात.

JEE Advanced परीक्षा कधी

२३ आयआयटीमध्ये बीटेक आणि युजी इंजिनिअरिंग प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ ला घेतली जाणार आहे.