कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ICMR ने केला ‘हा’ दावा

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : गेल्या दोन महिन्यांपासून भारतात (corona in India) कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) शिगेला पोहोचली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये (New Corona Patients) घट होत आहे. दरम्यान संसर्गाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र, (Maharashtra) दिल्ली (Delhi) आणि पश्चिम बंगालसह (West Bengal) अनेक राज्यांनी त्यांच्या सक्रिय (Corona Active case) केसलोडमध्ये घट नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तर इतरांमध्ये केसेसमध्ये वाढ होत आहे. भारतातील सक्रिय (COVID-19) रुग्णसंख्या आता 14.35 लाखांवर घसरली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे.

आयसीएमआर ( ICMR ) चे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या महिन्याच्या अखेरीस नवीन रुग्णांची संख्या मूळ पातळीपर्यंत खाली येईल. तर दैनंदिन प्रकरणांच्या आकडेवारीचा अहवाल देत या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये संसर्गाची संख्या कमी होत चालली आहे. तरीही रुग्णांची संख्या दररोज सुमारे 48,000 (काही आठवड्यांपूर्वी) वरून सध्या 15 हजारांपर्यंत घसरली आहेत.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले होते की, महामारीची तिसरी लाट मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संपुष्टात येईल. तसेच सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी करेल. दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली. तसेच काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले असून काही प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात आणखी शिथिल केले जातील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!