Home कोरोना भारताचा लसीकरणात विक्रम; ओलांडला १०० कोटींचा टप्पा

भारताचा लसीकरणात विक्रम; ओलांडला १०० कोटींचा टप्पा

0

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज भारताने इतिहास रचला आहे. भारतातील लसीकरणाचा Vaccination India आकडा आज 100 कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने 100 कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. परंतु 100 कोटी लसीकरणाचा आकडा पार केलेल्या चीननंतर भारत असा पराक्रम करणारा दुसरा देश बनला आहे.

भारतात आतापर्यंत, १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 75% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस First Dose Of Corona Vaccine देण्यात आला आहे. 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले आहे.

दरम्यान देशभरात 100 स्मारके तिरंग्याने प्रकाशित करण्याची देखील योजना आहे. आज लाल किल्ल्यावर 225 फूट लांब तिरंगा Indian Flag फडकवला जाईल. त्याचे वजन सुमारे 1400 किलो आहे. गायक कैलाश खेर यांचे गाणे आणि दृकश्राव्य (Audio Visual) चित्रपट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहेत.