Home देश भाजपला मोठा झटका; ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला मोठा झटका; ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली | भ्रमर वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनी राजकीच संन्यास घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ‘माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो आज राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल परिवारात सहभागी झाले, असे ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे.

बाबुल सुप्रियो यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आता TMC मध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा TMC मधील प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का तर तृणमूलसाठी फायद्याचा ठरणार आहे. 

दरम्यान जुलै महिन्यात बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम केला होता. सर्वात महत्त्वाचे  म्हणजे बंगालमध्ये भाजपकडून लढणाऱ्या बाबुल सुप्रियो यांनी ममता बॅनर्जींना जेरीस आणले होते. त्यामुळे बाबुल सुप्रियो यांच्या TMC मधील प्रवेशाने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सुप्रियो यांच्या प्रवेशानंतर आता आणखी काही बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.