राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले तुम्ही…

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगॅसस स्पायवेअरचा (Pegasus Spyware) वापर करून हेरगिरी केल्याप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून इंग्रजी वृत्तपत्राचे कटिंग पोस्ट केले आणि म्हटले की, आमच्या लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, राज्याचे नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी मोदी सरकारने पेगॅसस विकत घेतला आहे. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधक, सेना, न्यायव्यवस्था या सर्वांनाच टार्गेट केले आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

यापूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या एका अहवालात दावा केला होता की भारताने 2017 मध्ये संरक्षण दिनादरम्यान इस्रायलकडून स्पायवेअर खरेदी केले होते. अहवालात म्हटले आहे की मोदी सरकारने 2 अब्ज डॉलरच्या संरक्षण पॅकेजचा भाग म्हणून ते विकत घेतले होते, ज्यामध्ये स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणाली ‘केंद्र’ होती. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी यापूर्वीच सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी या मागणीसाठी ५ ऑगस्ट २०२१ रोजी काही खटले दाखल झाले आहेत. याच खटल्यांची सामूहिक सुनावणी करताना न्यायालयाने आता तज्ज्ञांच्या समितीमार्फत तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३० जुलै २०२१ रोजी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या पेगॅसस हेरगिरीप्रकरणाचे व्यापक परिणाम असू शकतात असे सांगितले होते. यावर सरन्यायाधीश रमण यांनी हा युक्तीवाद मान्य करत या खटल्यांची सुनावणी आवश्यक असल्याचे निरिक्षण नोंदवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!