नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : रेल्वेत भोजनासंबंधित त्रस्त अससेल्या प्रवाशांची समस्या लक्षात घेत येत्या 14 फेब्रुवारी पासून सर्व ट्रेनमध्ये आयआरसीटीसी कडून भोजनाची सुविधा पुरवली जाणार आहे. आयआरसीटी हा रेल्वे मंत्रालयाचा एक सार्वजनिक उपक्रम असून जो भारतीय रेल्वेत प्रवाशांना प्रीमियम सेवा देण्यास पुढे आहे. प्रवाशांची आवश्यकता आणि देशभरातील कोरोना लॉकडाउन निर्बंधात शिथीलता आणल्याने पुन्हा एकदा भोजनाची सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 रोजी रेल्वेने केटरिंग सेवा बंद केल्या होत्या.

आयआरसीटीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिजलेले जेवण हे नियम आणि अटींनुसार दिले जाणार आहे. 428 ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न आधीच दिले गेले आहे. एकूण संख्येच्या ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न 21 डिसेंबर पर्यंत 30 टक्के दिले गेले होते. तसेच आतापर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये शिजवलेले अन्न दिले जात होते.
22 जानेवारी पर्यंत 30 टक्के आणि उर्वरित 20 टक्के 14 फेब्रुवारी पर्यंत दिले जाणार आहे. प्रीमियम ट्रेन (राजधानी, शताब्दी, दुरांतो) मध्ये शिजवलेले अन्न आधीच दिले जात होते. दरम्यान, 23 मार्च 2020 रोजी कोरोनाच्या परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या हेतूने खाण्यापिण्याच्या सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या. देशात कोविडच्या रुग्णांमध्ये जशी घट होण्यास सुरुवात झाली तशी ट्रेनमध्ये ऑगस्ट महिन्यापासून भोजन देण्यास सुरुवात झाली.
तसेच स्थानकांच्या स्वच्छतेबाबतही रेल्वे प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात आले असून नव्या नियमानुसार रेल्वेच्या आवारात कोणीही अस्वच्छता करताना दिसल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (National Green Tribunal) ने अस्वच्छता करणाऱ्या लोकांसाठी कडक पावले उचलली असून त्याअंतर्गत आता कचरा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.