राजपथावर महाराष्ट्राचा डंका; चित्ररथाला मिळाला ‘हा’ पुरस्कार

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर (Republic Day Parade) झालेल्या चित्ररथ प्रदर्शन सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिले बक्षिस मिळाले असून सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणूनही उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्ररथाचा गौरव करण्यात आला आहे. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत (Popular Choice Category) महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली आहे.

महाराष्ट्राने राजपथावर राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवणारा चित्ररथ सादर केला होता. राज्यातील जैवविविधता आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातील समालोचन त्यामुळे या चित्ररथाला नेटकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली होती. ऑनलाईन व्होटिंगमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक पसंतीची मते मिळाली होती. त्यानंतर आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात महाराष्ट्राला पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिले बक्षिस देण्यात आले आहे. यवतमाळच्या तरुणांनी साकारलेला हा चित्ररथ संपूर्ण देशवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.

http://https://twitter.com/ANI/status/1489506594589081604

यंदा संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते.तसेच या संचलनात सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळाला असून याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आले आहे. तसेच मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. यंदाच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आलेला होता.

दरम्यान यंदाच्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रासह १२ राज्यांनी आणि ७ मंत्रालयांनी चित्ररथ सादर केला होता. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला होता. यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंची आणि ६ फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसेच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आले होते. त्यावर इतर छोटी आकर्षंक फुलपाखरांची लोभस प्रतिकृती होती. चित्ररथावर १५ फूट भव्य असे ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!