नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule University) कार्यरत असलेल्या प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू (chancellor of JNU) म्हणून पंडित त्या कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे.

शांतिश्री धुलीपुडी, या जेएनयूच्या १३ व्या कुलगुरू होणार आहेत. पंडित या प्राध्यापक एम. जगदेश कुमार यांच्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्त होणार आहे. जेएनयूच्या कुलगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी पूर्ण झाल्यापासून एम जगदेश कुमार हे कार्यवाहक कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत होते.

Prof Santishree Dhulipudi Pandit, Savitribai Phule Pune University, Maharashtra appointed as the Vice-Chancellor of Jawaharlal Nehru University, Delhi for a period of five years.
— ANI (@ANI) February 7, 2022
शांतिश्री या जेएनयूची माजी विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून त्यांनी १९८६ मध्ये एमफिल आणि १९९० मध्ये पीएचडी मिळवली. यापूर्वी त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातही अध्यापन केले आहे.
दरम्यान ५९ वर्षीय शांतिश्री यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. तेव्हा त्यांची आई तिथल्या लेनिनग्राड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तामिळ आणि तेलुगू विषयांची प्राध्यापक होत्या. माजी कुलगुरू कुमार आणि विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद असताना त्या अशा वेळी विद्यापीठाचे नेतृत्व करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहेत.