‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांची नात सौंदर्या (Soundarya) यांनी आज शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या 30 वर्षांच्या होत्या. सौंदर्या या येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची मुलगी होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सौंदर्या नीरज या बंगळुरूच्या रमैया हॉस्पटलमधे डॉक्टर होत्या. तसेच रमैया यांचे डॉ. नीरज यांच्याशी २०१९ मध्ये लग्न झाले होते. आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मोलकरणीने बराच वेळ दरवाजा ठोठावला परंतू आतून दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून तिने डॉ. नीरजना फोन करून माहिती दिली. नीरजनी घरी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा सौंदर्या हिचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

दरम्यान रमैया यांच्या मृतदेहाचे बोअरिंग लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम सुरू असून बंगळुरूच्या हाय ग्राउंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!