Home देश ‘या’ कारणामुळे बदलणार फेसबुकचे नाव

‘या’ कारणामुळे बदलणार फेसबुकचे नाव

0

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : सोशल मीडिया कंपनी फेसबुक इंक (Facebook Inc) पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याची योजना आखत आहे. एका रिपोर्टनुसार, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्यावर चर्चा करू शकतात.

अहवालांनुसार, कंपनीला हा निर्णय घ्यायचा आहे जेणेकरून Facebook ला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त ओळख मिळावी. रीब्रँडिंगनंतर, फेसबुकचे सोशल मीडिया अॅप हे मूळ कंपनीच्या अंतर्गत उत्पादन असेल. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, Oculus इत्यादी इतर प्लॅटफॉर्म देखील या मूळ कंपनीमध्येच येतील. मेटाव्हर्स metaverse पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त आहे.

झुकेरबर्गने 2004 मध्ये या सोशल नेटवर्कची सुरुवात केली होती. त्याने म्हटले आहे की फेसबुकच्या भविष्यासाठी मेटावर्स कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे. ही एक कल्पना आहे, ज्यामध्ये युजर्स व्हर्च्युअल जगात राहतील, काम करतील आणि व्यायाम करतील. कंपनीची Oculus व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट आणि सेवा त्याचे व्हिजन पूर्ण करण्याचा महत्त्वाचा भाग आहे.

दरम्यान फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग यांनी जुलै महिन्यात earning कॉलमध्ये म्हटले होते की कंपनीचे भविष्य ‘मेटावर्स’ मध्ये आहे. मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला (आभासी जग) अधिक प्राधान्य देण्याची भूमिका होय. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल जगात फिरत त्याला मेटाव्हर्स असे म्हणतात.