राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. पण कोर्टाच्या या निर्णयाविरोधात मलिक आता हायकोर्टात धाव घेणार आहे. दरम्यान, मलिकांचा जामीन फेटाळण्यात आला असला तरी त्यांची तुरुंगात रवानगी होणार नाही, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु राहणार आहेत.

अधिक माहितीनुसार, वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. तसेच ईडीच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सांगितले आहे की, प्राथमिकदृष्ट्या याप्रकरणी तपास यंत्रणांनी जे पुरावे गोळा केले होते, त्यानुसार त्यांच्यावरील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी काही महिने सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने आज निकाल दिला आहे.

नवाब मलिकांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत त्यांच्यावरील उपचार सुरुच राहणार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटळण्यात आला असला तरी त्यांची रवानगी लगेच तुरुंगामध्ये होणार नसून ते रुग्णालयातच उपचार घेणार आहेत. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात आता तातडीने हायकोर्टात धाव घेणार असल्याचे मलिकांच्या वकिलांनी सांगितले आहे.

https://twitter.com/ANI/status/1597893055235096576?s=20&t=vYMtG4deY_ojD_6hJs9CYQ

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!