नीरज चोप्रा याचा नवा राष्ट्रीय विक्रम

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- भालाफेक पटू नीरज चोप्रा याने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याने पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर भालाफेक करुन नवा राष्ट्रीय विक्रम रचला आहे. या विक्रमाबरोबर त्याने त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेला 87.58 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करताना नीरज चोप्रा याने भालाफेकमध्ये सुवर्ण कामगिरी केली. त्याने आता स्वत:चाच टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत नवीन इतिहास रचला आहे. नीरजने पोलंडमध्ये सुरु असलेल्या जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत 89.30 मीटर भालाफेक करत हा नवीन विक्रम रचला आहे.

सध्या फिनलँडमध्ये सुरू असलेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्रा सहभागी झाला आहे. त्याने 89.30 मीटर लांब भालाफेक करत, रौप्य पदक पटकावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!