नवी दिल्ली :- देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढता बाधितांचा आकडा या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या प्राचरसभा, रॅलींवर काही निर्बंध लादले होते. परंतु, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात असून देशात निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच निवडणूक आयोगाने प्रचार सभांवरील निर्बंध सध्या कमी केले आहेत.

देशातील कोरोनाबाधितांची घटती प्रकरणे पाहून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. प्रचार सभांसाठी आणि रॅलींसाठी निवडणूक आयोगाने जरी सूट दिली असली, तरी उमेदवारांना मात्र कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
निवडणूक आयोगाने रॅली आणि रोड शोसाठी पुन्हा नवीन मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे जारी केल्या आहेत :
- प्रचाराच्या वेळेवर बंदी रात्री 8 ते सकाळी 8 ऐवजी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल.
- 50 टक्के गर्दीसह रॅलीला परवानगी
- रोड शोला मर्यादित संख्येने मंजुरी
- आता 1 हजार लोकांच्या भेटीसाठी मंजुरी
- 10 ऐवजी 20 लोकांसह घरोघरी प्रचाराची परवानगी
- 300 ऐवजी 500 लोक आता इनडोअर मीटिंगला उपस्थित राहू शकतील