मुंबई :- 26 मार्च रोजी आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा रणसंग्राम सुरु होणार आहे. या हंगामासाठी प्रत्येक संघ आपली नवी जर्सी लाँच करत आहेत. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने नवीन जर्सी आज सोशल मीडियावरुन लाँच केली आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1502561900122439686?t=al19Odi9LbAv-bEqXN7b3A&s=19

नवीन जर्सीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नवीन जर्सीवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना 27 मार्च रोजी दिल्ली विरुद्ध होणार आहे. सहाव्या विजेतेपदासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ मैदानात उतरणार आहे.