देशाला मिळणार नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली :- देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. 18 जुलैला यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

गेल्या 45 वर्षांपासून याच निवडणुक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्च पदी निवड होत आहे. राष्ट्रपती निवडण्यासाठी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतील. नव्याने राष्ट्रपदी होण्यासाठी काही नावेही चर्चेत आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

15 जून अधिसूचना जारी होणार

29 जून उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख

2 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार

18 जुलै, मतदान होणार

21 जुलै, निकाल लागणार

24 जुलैपर्यंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ

यावेळी 776 खासदार, 4033 आमदार मतदानाचा हक्क बजावणार असून संसद आणि विधानसभांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी “ही” नावे चर्चेत

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल
छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके
तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन
झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!