नाशिकरोड (प्रतिनिधी):-
नाशिकरोड येथील दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे सेवानिवृत्त
शाखाधिकारी हे सोमवार आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी असतांना
मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप 407 गाडीने धक्का दिल्याने त्यांचा गाडी
खाली सापडून दुर्दैवी मृत्यु झाला. अपघात घडल्या नंतर पिकअप 407 गाडी
चालकाने घटना स्थळावरून पळ काढला आहे.
या
घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार , चेहडी येथील दिनकर धोंडीराम ताजनपुरे
(वय६२) नाशिकरोड येथील दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे सेवानिवृत्त
शाखाधिकारी हे सोमवार असल्याने देवळाली गाव येथे आठवडे बाजारला संध्याकाळी
सहा वाजेच्या सुमारास बिटको चौक येथून जात असतांना मुक्तीधाम, जामा मस्जिद
समोरून कॅम्प कडे जाणाऱ्या पिकअप 407 गाडीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक
दिली, त्यात ताजनपुरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर
पिकअप 407 गाडी थोड्या आनंतरावर थांबली मात्र घटनास्थळी पादचारी ,
नागरिकांची गर्दी वाढल्याने गाडी चालकाने पळ काढला. ताजनपुरे हे व्यापारी
बँकेत कार्यरत असताना भगूर, सुभाष रोड, मुख्य शाखा, इंगळे नगर आदी शाखेत
शाखाधिकारी म्हणून काम केले. मनमिळाऊ, हसतमुख स्वभावाने ते सर्वत्र परिचित
होते. त्यांच्या पाश्चत पत्नी,दीपक आणि सागर हे मुले आहेत.
अपघाताचे
वृत्त समजताच बँकेचे संचालक रमेश धोंगडे, शिवसेना युवा नेते राहुल
ताजनपुरे आदीनी बिटको रुग्णालयात धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते यांनी
गर्दी केली.व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, जेष्ठ संचालक निवृत्ती
अरिंगळे, जनसंपर्क संचालक रंजना बोराडे यांनी शोक व्यक्त केला.त्याच्या
निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकरोड
पोलिसात अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा पर्यंत दाखल होत होता.अधिक तपास
वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
हवालदार देवरे करीत आहे.