"या" कारणामुळे पती सतत त्रास द्यायचा , पत्नीने उचललं टोकाचं पाऊल ; नेमकं प्रकरण काय?
img
Dipali Ghadwaje
ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा होत नसल्याने त्याने पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं पत्नीने टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मुलगा का होत नाही म्हणून पती वारंवार आपल्या पत्नीला छळत होता. तसंच तीला आत्महत्येला प्रवृत्त करत होता. याच त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू केली आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा होऊ न शकल्यामुळे 33 वर्षीय पती त्याच्या पत्नीला त्रास देत होता. यातूनच 25 वर्षीय पत्नीने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. 

आरोपी विशाल गवई याने दर्शनासोबत प्रेमविवाह केला होता. विशाल गवई पत्नीच्या आई-वडिलांकडे नेहमी पैसे मागायचा. यातून दोघांमध्ये वाद व्हायचा. त्यानंतर दोन मुलींना जन्म दिल्याने दर्शनाचा छळ व्हायचा. याच त्रासाला कंटाळून तीने घराच्या गच्चीवार जात गळफास घेतला.

त्यानंतर आता आरोपी पतीवर कलम 108 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 80 (हुंडाबळी), 115 (2) (स्वच्छेने दुखापत करणे) आणि 352 (शांततेचा भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान करणे) नुसार अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group