जेष्ठ हिंदी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पार्थो घोष यांचे आज 9 जून 2025 रोजी मुंबईतील मड आयलंड येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी हृदयविकार झटक्याने निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी करत श्रद्धांजली वाहिली असून, त्यांनी पार्थो घोष यांचे एक "नेक दिलाचा आणि सिनेमातील जादूगार" म्हणून वर्णन केले .
पार्थो घोष यांनी 1990 च्या दशकात चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली. त्यांनी ‘100 Days’ (1991), ‘गीत’ (1992), आणि ‘तिसरा कौन?’ (1994) यांसारख्या चित्रपटांद्वारे पदार्पण केलं. त्यांच्या करिअरचा उत्कर्ष ‘दलाल’ (1993) आणि ‘अग्नी शक्ती’ (1996) या चित्रपटांनी आणला, या कथा प्रेक्षकांना खूप भावल्या.
पार्थो घोष यांनी 'गुलाम-ए-मुस्तफा' (1997) आणि 'युगपुरुष' (1998) सारख्या चित्रपटांनाही निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून हातभार लावला. त्यांच्या सिने जगतातील योगदानामुळे त्यांनी विविध यशस्वी प्रकल्प हातात घेतले.
दिग्दर्शकीय कामाबरोबरच, पार्थो घोष यांनी बंगाली चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्येही काम केले. 1985 मध्ये असिस्टंट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्यानंतर ते ‘100 Days’ या थ्रिलर चित्रपटाने स्वतःला सिद्ध केले. 2018 मध्ये ‘मौसम इकरार के दो पल प्यार के’ यांनी त्यांच्या करिअरमध्ये नवीन आयाम आणला.
ऋतुपर्णा सेनगुप्ता यांसह अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि पत्रकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली.