मुंबई : अहमदाबाद येथे विश्वचषकाचा रंगलेल्या अंतिम सामन्यावर अब्जावधींचा सट्टा लावण्यात आल्याचे समोर येत आहे. यात, गेमिंगच्या नावाखाली ऑनलाइन बेटिंग खेळणाऱ्या संकेतस्थळ तसेच ॲपवरील सट्टेबाजीही जोरात होती. हेच सट्टेबाज पोलिसांच्या रडारवर आहे. सलग दहा सामने जिंकल्यामुळे सुरुवातीपासून भारताचे पारडे जड होते.
त्यामुळे बुकींचा कलही त्यांच्या दिशेने वाढला होता. मॅ चच्या सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा अनुक्रमे ४५ आणि ४६ पैसे भाव होता. भारताची बॅटिंग संपल्यानंतर हा भाव ८ त १० रुपयांपर्यंत खाली आला. ऑस्ट्रेलियाचा अर्धा डाव सुरू असताना हा भाव १६ आणि १७ रुपयांवर होता. त्यानंतर भारतीय गोलंदाज विकेट काढतील यासाठी सट्टेबाजीचा जोर वाढल्याची माहिती समजतेय.
मोठे बुकी दुबई, लंडन, बँकॉक तसेच परदेशात बसून सट्टा खेळतात. अब्जावधींचा सट्टा लावण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा मुंबईतील महत्त्वाच्या बुकींवर लक्ष ठेवून आहे.