बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार ; 9 जणांचा मृत्यू स्वत: लाही संपवलं
बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार ; 9 जणांचा मृत्यू स्वत: लाही संपवलं
img
Dipali Ghadwaje
एका शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये बंदूक घेऊन जात अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये तब्ब 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये या विद्यार्थ्याने स्वत: ला देखील संपवलं आहे. ऑस्ट्रियातील सर्वांत मोठं शहर असलेल्या ग्राजच्या एका शाळेमध्ये ही घटना घडली आहे.

या घटनेमध्ये ऑस्ट्रियाच्या प्रेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार ग्राड शहराच्या मेयरने यावर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, एका शाळेमध्ये एक विद्यार्थी बंदूक घेऊन पोहचला होता. या बंदुकीच्या सहाय्याने त्यांने शाळेमध्ये दिसेल त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. त्यामध्ये तब्बल 7 विद्यार्थी आणि इतर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ते स्वच्छाचा गृहामध्ये गेला आणि तेथे त्याने स्वत: वर देखील गोळी झाडत स्वत: ला संपवलं.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. त्यात पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला या घटनेची माहिती सकाली 10 वाजता मिळाली होती. त्यानंतर त्यांना शाळेच्या इमारतीतून गोळीबाराचा आवाज आला.

त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तेथील लोकांना तेथून हटवलं. तसेच या भागातून नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितलं. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना देखील सुचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

तर याबाबत सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, ही शाळा रिकामी करण्यात आली आहे. तसेच सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता कोणताही धोका नाही. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group