माथेरान पर्यटकांनी हाऊसफुल्ल..! चढणीच्या रस्त्यावरच वाहनं अडकली ; नेमकी काय परिस्थिती? वाचा
माथेरान पर्यटकांनी हाऊसफुल्ल..! चढणीच्या रस्त्यावरच वाहनं अडकली ; नेमकी काय परिस्थिती? वाचा
img
Dipali Ghadwaje
सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत.पावसामुळे अनेकजण फिरण्याचा प्लान करतात. निसर्गरम्य वातावारणात  फिरायला जाण्यासाठी मुंबईजवळ असलेलं बेस्ट ठिकाण माथेरान. त्यात सलग दोन दिवस वीकेंड असल्यामुळे अनेकजण फिरायला माथेरानला गेले आहेत.

दरम्यान, माथेरान मार्गावर आज प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.दस्तुरी पासून चांगभल मंदिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दस्तुरी पासून तिसऱ्या वळणा पर्यंत वाहनांची रांग पोहोचली आहे. विकेंडसाठी माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी झाली आहे. तीव्र चढ असल्याने वाहने उभी करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल होत असून , प्रवासी संतापले आहेत. वाहने रस्त्यात सोडून पर्यटकांची पदयात्रा सुरु झाली आहे. पर्यटक चालत निघाले आहेत. प्रत्येक माथेरानच्या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य अजूनच खुललं आहे. हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जातात. पावसाळ्यात नेहमीच माथेरानला पर्यटकांची गर्दी असते. आजही ही गर्दी पाहायला मिळाली आहे.

त्यामुळे मात्र, पर्यटकांना तासन् तास ताटकळत उभं राहावं लागत आहे. या वाहतूक कोंडीला पर्यटक वैतागले आहेत. शेवटी पर्यटक कारमधून उतरुन चालत निघाले आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group