बारावीनंतर चांगले करिअर करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी विद्यार्थी विविध विषयांसाठी स्पर्धा परीक्षा देतात. दरम्यान, नुकताच MH-CET चा निकाल जाहीर झाला आहे. इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी शाखेत प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
आता PCM ग्रुपचा MH-CET चा निकाल जाहीर झाला आहे. PCM ग्रुपचा निकाल जाहीर झाला आहे. www.mahacet.org या वेबसाइटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकतात. हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला फक्त सीट नंबर आणि आवश्यक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसणार आहे.
PCM ग्रुपसाठी ४६४२६३ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. यातील 422663 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ५ मे रोजी ही परीक्षा झाली होती. महाराष्ट्राचा निकाल 91.04% टक्के झाला आहे. राज्यातील २२ विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेतली होती. इंजिनियरिंगसाठी अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तर PCB ग्रुपचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.
निकाल कसा पाहाला
- सर्वात आधी तुम्हाला https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइटवर जायचे आहे.
- यानंतर तुम्हाला MHT-CET 2025 या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- यानंतर PCM Group निवडा.
- यानंतर मेल आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- यानंतर तुम्हाला निकाल दिसेल.
- तुम्ही तुमचे स्कोअरकार्ड डाउनलोड करु शकतात.