शैक्षणिक : तिसऱ्या भाषेविषयी मोठी माहिती ; भाषा कशी शिकवणार, शिक्षक कसे भरणार? वाचा...
शैक्षणिक : तिसऱ्या भाषेविषयी मोठी माहिती ; भाषा कशी शिकवणार, शिक्षक कसे भरणार? वाचा...
img
Dipali Ghadwaje
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा भारतीय भाषा शिकविण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेले वेळापत्रक आणि विषयनिहाय योजना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केली.

त्यानंतर आता यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे तिसरी भाषा शिकवण्यासाठी कंत्राटी शिक्षण भरण्यात येणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा काही अटींसह अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देणारे शुद्धिपत्रक शालेय शिक्षण विभागाने १७ जून रोजी प्रसिद्ध केले.

यामुळे राज्यात हिंदी पहिलीपासून अप्रत्यक्षपणे सक्तीनेच शिकवली जाणार असल्याचं दिसून येत आहे. या निर्णयावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, शिक्षण विभागाने आता निर्णयाच्या अंमलबजावणीचे पाऊल उचललं आहे.

दुसरीकडे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा काही अटींसह अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून दिला गेला असला तरी त्यासाठी शिक्षक मात्र उपलब्ध नाही.

त्यामुळे आता सरकारला त्या-त्या भाषा शिकवणारे शिक्षक उपलब्ध करून त्या भाषा शिकवाव्या लागतील. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली जाणार आहे.

तसेच संबंधित भाषा   शिकणारे विद्यार्थी हे जर 20 पेक्षा कमी असतील तर तेथे ऑनलाईन पद्धतीने शिकवले जाणार आहे. अशी माहिती देखील समोर आली आहे.

त्यासाठी बालभारतीचा व्हिडीओचा प्लॅटफॉर्म वापरण्यात येणार आहे. यासाठी 23 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group