पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात आत्मघातकी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात १६ सैनिक ठार तर २५ जण जखमी झाले. यात सैनिक आणि नागरिकांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यातील एका वाहनाला धडकवले. यात १६ सैनिकांचा मृत्यू झाला आणि ६ लष्करी कर्मचारी आणि १९ नागरिक जखमी झाले. हल्ल्यात दोन घरांचे छप्पर कोसळले, ज्यामध्ये सहा मुले देखील जखमी झाली आहेत.
पाकिस्तान तालिबानच्या हाफिज गुल बहादुर शाखाने या हल्ल्याच्या जबाबदारी घेतलीय, एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ जखमी सैनिकांची प्रकृती गंभीर आहे.
२०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हिंसाचार वाढला आहे. अफगाणिस्तान आपल्या जमिनीच्या गैरवापर करत आहे. आपल्या देशातील जमिनीचा वापर पाकिस्तानविरोधात दहशतवादी कारवाया करण्यास करत आहे. दरम्यान तालिबानकडून पाकिस्तानने केलेले आरोप खोडून काढले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २९० लोक मारले गेले आहेत.