आंध्र प्रदेशात एका प्रसिद्ध मंदिराच्या प्रसादात मेलेला झुरळ आढळल्याची घटना घडली आहे. आंध प्रदेशमधील एका प्रसिद्ध मंदिरात प्रसाद म्हणून वाटण्यात येणाऱ्या लाडूमध्ये झुरळ आढळला. या प्रकारानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आंध प्रदेशच्या श्रीशैलम देवस्थानम मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटप केले जातात. याच लाडूमध्ये मेलेला झुरळ आढळल्याची घटना घडली. सरसचंद्र नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला.
या व्हिडिओमध्ये प्रसादामध्ये मेलेला झुरळ आढळला. या व्हिडिओतून हा प्रसाद श्रीशैलम देवस्थानम मंदिरातील असल्याचा दावा केला जात आहे. सरसचंद्र याने पोस्ट करत मंदिर प्रशासनाला तक्रार दिली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
भाविकाने तक्रारीत म्हटलं की, 'श्रीशैलम देवस्थानम मंदिरात गेलो होतो. मंदिरात दर्शन केल्यानंतर प्रसाद म्हणून लाडू मिळाला. प्रसाद खाताना त्यात मेलेला झुरळ आढळला. या पत्रात भाविकाने मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावर सवाल उपस्थित केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रकार घडल्याचे भाविकाने आरोप केला आहे. या प्रकारानंतर मंदिर प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी, असं म्हटलं आहे.