महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला, रोहिणी खडसेंची संतापजनक पोस्ट , वाचा
महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला, रोहिणी खडसेंची संतापजनक पोस्ट , वाचा
img
Dipali Ghadwaje
पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडल्याची  माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक प्रवासी होते.

यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन आला, त्याने केशरी रंगाचा कुर्ता घातलेला होता. तो महात्मा गांधींचा पुतळा असलेल्या चौथऱ्यावर चढला अन् त्याने पुतळ्यावर  कोयत्याने वार केले.

प्रवाशांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर तेथे रेल्वे पोलिसांना बोलविण्यात आलं. रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरज शुक्ला याला चौथऱ्यावरुन खाली उतरवत ताब्यात घेतलं. सुरज शुक्लाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या छातीवर अन् पायाने कोयत्याने वार केले होते. गांधींच्या पुतळ्याचे डोकं त्याला कोयत्यानं तोडायचं होतं. परंतु, त्याआधीच रेल्वे पोलिसांनी सुरजला ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असं सांगितलं जातंय.

प्राथमिक माहितीनुसार सुरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे. तो नोकरीसाठी पुण्यात असून रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकतो. काही दिवसांपूर्वी तो साताऱ्यातून पुण्यात आला होता. पोलिसांनी चौकशी करत त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने हे कृत्य का केलं? याचा तपास पोलीस करत आहेत.

रोहिणी खडसे यांची पोस्ट

दरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील यासंदर्भात X अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा व्यक्ती महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथर्यावर चडलेला दिसतोय. त्याच्या हातात कोयताही दिसून येतोय. महात्मा गांधींची गोळ्या झाडून निघृण हत्या केली तरी ‘यांचे’ मन अजूनही भरले नाही. म्हणून आता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर राग काढत आहेत. पण ‘या’ लोकांनी एक ध्यानात ठेवावे. गांधी अमर आहेत, गांधी मरा नहीं करते, असं त्यांनी म्हटलंय.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group