तुमचा फोन चोरी झाला आहे ? घाबरू नका,  भारत सरकारचे 'हे  पोर्टल ठरेल वरदान
तुमचा फोन चोरी झाला आहे ? घाबरू नका, भारत सरकारचे 'हे पोर्टल ठरेल वरदान
img
दैनिक भ्रमर

अन्न , वस्त्र , निवारा हे जगण्यासाठी जसे महत्त्वाचे आहे तसेच मोबाईल हा देखील प्रत्येकाच्या जीवनाचा आवश्यक भाग बनला आहे. अनेकांना तर मोबाईल बघितल्याशिवाय जेवणही जात नाही. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, फोटोज मोबाईल मध्ये आपण सुरक्षित ठेवतो. पण हाच मोबाईल जर हरवला तर ? आपला फोन चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर टेंशन येत. कोणी मोबाईलचा गैर वापर तर करणार नाही ना अशी भीती वाटू लागते. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता भारत सरकारने फोन चोरीच्या रिपोर्टसाठी CEIR पोर्टल सुरू केले आहे. ज्याबद्दल तुम्हांला माहित असणे गरजेचे आहे. 

Centralised Equipment Identity Register (CEIR) – हे सर्व हरवलेल्या किंवा जुन्या फोन्सचं एकसंध असं पोर्टल आहे. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही इथे जाऊन त्याचा पूर्ण तपशील भरू शकता. तुमची माहिती, फोनचा IMEI नंबर, कुठे कसा हरवला, इत्यादी. मग या पोर्टलवरून ही सर्व माहिती या पोर्टलवरून टेलेकॉम सेवा पुरवठादारांकडे आणि सोबतच पोलिसांच्या ट्रॅकिंग यंत्रणांसोबत शेअर केली जाते. अनेकदा असं होतं की चोरटे त्यांनी बळकावलेल्या फोनचा IMEI नंबर बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा तो फोन दुसऱ्या राज्यात विकण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा या पोर्टलवरून सगळीकडची माहिती मिळू शकेल. CEIR पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल तात्काळ ब्लॉक करू शकता जेणेकरून कोणीही फोनवरून तुमचा डेटा आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकणार नाही. याशिवाय सर्वसामान्य माणूस या पोर्टलवर घरबसल्या आपली तक्रार नोंदवू शकतो आणि त्याच्या तक्रारीची स्थितीही जाणून घेऊ शकतो. 

KYM अर्थात Know your Mobile – जर तुम्ही एखादा जुना फोन विकत घेणार असाल तर त्या फोनचा IMEI नंबर बदलण्यात आला आहे का, तो फोन कधी चोरण्यात किंवा चुकीच्या कामासाठी वापरण्यात आला होता का, याची माहिती मिळते. तुम्ही कुठला सेकंड हँड फोन विकत घेताना, हे पोर्टल महत्त्वाचं ठरू शकतं.

ASTR – ही एक AI-based सेवा आहे, जिथे एकाच व्यक्तीच्या नावावर किती कनेक्शन आहेत, याची माहिती मिळू शकते. जर कुण्या व्यक्तीने ओळखपत्रांमध्ये छेडछाड करून वेगवेगळ्या आधार कार्डने अनेक कनेक्शन्स घेतली असतील, तर ती शोधून काढण्याचं काम करतं.

सीईआयआर पोर्टलवर चोरीच्या फोनची तक्रार कशी करावी : 
१. सर्वप्रथम, ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल, त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवावा लागेल. 
२.  तुमच्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडून हरवलेल्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम कार्ड मिळवा.
३. सीईआयआर तक्रार ऑनलाइन नोंदणी फॉर्मवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp 
४. पोर्टलवर मोबाईल नंबर/IMEI क्रमांक भरून माहिती सबमिट करा.
५. संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आणि पत्ता प्रविष्ट करा. 
6. असे केल्याने भविष्यात हँडसेटला कोणत्याही मोबाइल नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापासून अवरोधित करेल. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group