उत्तर प्रदेशच्या बलारामपूर जिल्ह्यातल्या मधपूरमध्ये राहणाऱ्या जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि त्याची साथीदार असलेल्या नितू उर्फ नसरीन यांना उत्तर प्रदेश एटीएसनं काही दिवसांपूर्वी अटक केली. देशविरोधी कृत्य आणि अवैध पद्धतीनं धर्मांतरण करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या दोघांच्या अटकेनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या छांगूर बाबानं 1500 पेक्षा अधिक हिंदू मुलींचं अवैध पद्धतीनं धर्मांतरण केलं आहे.
छांगूर बाबा उत्तर प्रदेशात येण्यापूर्वी मुंबईतील एका दरगाहच्या बाहेर आंगठी विकण्याचा व्यावसाय करत होता. त्यानंतर तो अशा काही संस्थांच्या संपर्कात आला, ज्या हिंदू लोकांचं अवैध पद्धतीनं धर्मांतरण करून त्यांना मुस्लिम बनवतात. त्यानंतर तो महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील मधपूरमध्ये पोहोचला. तेथे त्याने अनेकांचं अवैध पद्धतीनं धर्मांतर घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या जवळचे नातेवाईक आणि त्याचे समर्थक ठिक-ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करून, त्यामाध्यमातून धर्मांतर घडवून आणण्यास त्याला मदत करत असल्याचं देखील समोर आलं आहे.
छांगूर बाबाच्या समर्थकांमध्ये महिलांची संख्या जास्त होती, आता एटीएसकडून छांगूर बाबानं फसवून आणि अवैध पद्धतीनं किती जणांचं धर्मांतर केलं, याचा शोध सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार छांगूर बाबाने उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे येण्यापूर्वीच महाराष्ट्रातून दुबईपर्यंत नेटवर्क बनवलं होतं, महाराष्ट्रात देखील त्याने अवैध पद्धतीनं अनेकांचं धर्मांतर घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
एटीएसच्या तापासात अशी देखील माहिती समोर आली आहे की, आपल्या कामांमध्ये काही अडथळा निर्माण न व्हावा यासठी तो काही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना तसेच इतर महत्त्वांच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचा, त्याने अनेकांचं अवैध पद्धतीनं धर्मांतरण घडवून आणलं. मात्र अशा पद्धतीनं किती जणांचं धर्मांतरण झालं याचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही, मात्र त्याने 1500 पेक्षा अधिक हिंदू तरुणींचं धर्मांतरण केल्याची माहिती समोर येत आहे. एटीएसकडून आता या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे.