आधी मुलगा शस्त्रक्रियेनंतर मुलगी, माजी भारतीय क्रिकेटपटूच्या 'या' मुलीने दिली गुड न्यूज
आधी मुलगा शस्त्रक्रियेनंतर मुलगी, माजी भारतीय क्रिकेटपटूच्या 'या' मुलीने दिली गुड न्यूज
img
दैनिक भ्रमर
आधी मुलगा मग ऑपरेशन करून मुलगी झालेली अनाया बांगर सध्या सर्जरीनंतर रिकव्हर होत आहे. नुकतीच तिची शस्त्रक्रिया झाली होती. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनया ही केवळ सोशल मीडियावर सक्रिय नाही तर चर्चेतही असते.

भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. आधी मुलगा असलेली नंतर जेंडर चेंज ऑपरेशन करत मुलगी झालेली अनाया बांगरने अलीकडेच तिची ओळख परत मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ती सध्या त्यातून रिकव्हर होत आहे. शस्त्रक्रियेनंतर तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अनायाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करून ही माहिती दिली. 

अनाया बांगरने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, “शस्त्रक्रियेनंतर माझी प्रकृती चांगली आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. जे माझा द्वेष करतात, त्यांचेही आभार.” यादरम्यान तिने सांगितले की तिच्या शस्त्रक्रियेवर एक डॉक्यूमेंट्री बनवण्यात आली आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही डॉक्यूमेंट्री लवकरच तिच्या यूट्यूब चॅनलवर लाँच केली जाईल.

या डॉक्यूमेंट्रीमध्ये अनाया बांगरने तिची ओळख कशी मिळवली हे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी संजय बांगरच्या मुलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली होती ज्यामध्ये तिने लिहिले होते, “माझ्या ओळखीकडे आणखी एक पाऊल जवळ”. असं तिने नमूद केलं होतं.

2 जुलै रोजी, अनाया बांगरने ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव सर्जशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये, ब्रेस्ट ऑग्मेंटेशनने तिच्या शारीरिक परिवर्तन प्रक्रियेला आणखी पुढे नेले आहे. अनाया बांगरने उचललेली ही पावले तिच्या लिंग बदलाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अनन्या बांगर आता मुलापासून मुलगी झाली आहे. ती लहान असताना तिला क्रिकेटपटू आर्यन बांगर म्हणून ओळखले जात असे, जो यशस्वी जयस्वालसोबत मुंबईकडून अंडर-16 संघात खेळला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group