
खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटोसेशन केलं आणि ते फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकून मिरवले. मात्र, हे ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं.
या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करत चार जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे, रामचंद्र ओमासे असे या आरोपीचे नावं आहेत.
याप्रकरणी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे. चारही आरोपींवर याआधी देखील सावकारी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत. या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.