खुशखबर ! पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच, मात्र हप्ता येण्याआधी 'हे' काम अनिवार्य
खुशखबर ! पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच, मात्र हप्ता येण्याआधी 'हे' काम अनिवार्य
img
दैनिक भ्रमर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या निधीची कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. हा २०वा हप्ता जून महिन्यात येणे अपेक्षित होते. परंतु हा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. या योजनेचा २० व्या हप्त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. 

कधी येणार  २० वा हप्ता ?
मिडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता १८ जुलै २०२५ रोजी येऊ शकतो. याच दरम्यान कधीही खात्यात पैसे जमा होतील. या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

२० वा हप्ता येण्याआधी हे काम करा
पीएम किसानचा हप्ता येण्यापूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फार्मर्स कॉनरवर क्लिक करायचे आहे. यानंतर केवायसी ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आधार नंबर टाका. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल तो टाका. यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होणार आहे.

यादीत तुमचं नाव आहे का? 
सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जावे.

यानंतर किसान कॉर्नर सेक्शनवर जाऊन लाभार्थी यादीवर क्लिक करा.

यानंतर राज्य, जिल्हा, गाव याची माहिती भरा.

यानंतर रिपोर्ट प्राप्त करा या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्ही CSC किंवा सेल्फ रजिस्ट्रेशन स्टेट्सवरक्लिक करा.

यानंतर आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन आणि अप्रुवल सेट्ट तुम्हाला दिसेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group