मोठी बातमी : चॅटजीपीटी जगभरात डाऊन : हजारो युजर्सच्या तक्रारींचा पाऊस ; नेमकं काय सुरु आहे?
मोठी बातमी : चॅटजीपीटी जगभरात डाऊन : हजारो युजर्सच्या तक्रारींचा पाऊस ; नेमकं काय सुरु आहे?
img
Dipali Ghadwaje
आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.  जगातील लाखो युजर्सना OpenAI चे लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT च्या वापरात अडचणी  येत आहेत. अमेरिकेत या समस्येची तीव्रता जास्त होती. येथे साडेआठ हजारांहून अधिक युजर्सने याबाबतीत तक्रारी केल्या. लॉग इन न होणे, एरर मेसेज आणि चॅट लोड न होणे अशा समस्या येत होत्या. या तक्रारींना एआयने प्रतिसाद दिला आहे.

आऊटेज ट्रॅक करणारी वेबसाइट Downdetector नुसार 81 टक्के युजर्सना ChtGPT शी संबंधित अडचणी आल्या. तर दहा टक्के लोकांना वेबसाइटमध्ये तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

9 टक्के युजर्सना मोबाइल अॅपमध्ये अडचणी येत होत्या. भारतातही काही युजर्सना चॅटजीपीटीत अडचणी येत होत्या. परंतु, भारतात या अडचणी फारशा नव्हत्या. सकाळी साडेसात वाजेपर्यंत भारतात फक्त 153 युजर्सने तक्रारी केल्या होत्या. भारतात या अडचणींचं प्रमाण अतिशय नगण्य राहिलं.

युजर्सना चॅटजीपीटीच्या वापरात अनेक प्रकारच्या समस्या जाणवल्या. यामध्ये वारंवार एरर मेसेज येणे, चॅट लोड न होणे, लॉग इन करतानाही अडचणी आणि Unusual Activity चा अलर्ट दिसणे अशा प्रकारच्या समस्या होत्या. या अडचणी बराच काळ निकाली काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे युजर्सचा ताण वाढला होता. या समस्या लवकरात दूर करण्याची मागणी केली जात होती.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group