अरे वा....! आता वर्गात कोणताच विद्यार्थी नसणार ‘बॅकबेंचर’ ; शाळेतील आसन व्यवस्थेत मोठा बदल , वाचा
अरे वा....! आता वर्गात कोणताच विद्यार्थी नसणार ‘बॅकबेंचर’ ; शाळेतील आसन व्यवस्थेत मोठा बदल , वाचा
img
Dipali Ghadwaje
शाळा म्हटलं की मजा, मस्ती अन्  मित्र-मैत्रिणींसोबत आवडत्या बेंचवर बसण्याची धडपड आलीच. अशातच  केरळमधील शाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली असून, यात आता कोणताही विद्यार्थी ‘बॅकबेंचर’ राहणार नाही.

शिक्षकांच्या समोर पुढच्या बेंचवर बसतात ती मुलं विशेषता  हुशार आणि बॅकबेंचर मुलं म्हणजे मठ्ठ, ढ अशी विशेषणे लागतात. अनेकदा मागचीही मुलं हुशार असतात. मात्र, अनेकदा तसं म्हटलं जात. मात्र, गोष्टींना छेद देणारी एक हटके कल्पना समोर आली आहे.

केरळमधील शाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली असून, यात आता कोणताही विद्यार्थी ‘बॅकबेंचर’ राहणार नाही. केरळमधील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या नव्या व्यवस्थेमुळे ‘बॅकबेंचर्स’ ही संकल्पना संपुष्टात येत आहे.

यामुळे वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्या बाकावर बसायची संधी मिळत आहे. दक्षिण केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील वालाकोम येथील रामविलासोम व्यावसायिक उच्च माध्यमिक शाळेने बदललेली विद्यार्थ्यांची वर्गात बसण्याची व्यवस्था नवोपक्रमाचे एक मॉडेल ठरत आहे, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडं लक्ष देणं शिक्षकांसाठी सोपं झालं आहे.
 
चित्रपटापासून प्रेरणाशाळांनी स्थानार्थी श्रीकुट्टन या चित्रपटापासून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये शाळेतील मुले बॅकबेंचर नसतील अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सहज पोहोचता येतं, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडं सहज पाहता येतं आणि विद्यार्थीदेखील त्यांच्या शिक्षकांना सहजपणे   पाहू शकतात. केरळमधील आठ शाळांनी आधीच ही बसण्याची व्यवस्था स्वीकारली आहे आणि पंजाबमधील एका शाळेतही ती लागू केली आहे.
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group