दिलासादायक बातमी ! पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त ;
दिलासादायक बातमी ! पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त ; "ही" महत्वाची माहिती आली समोर
img
DB
देशभरातील वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. दरम्यान, आता या भावांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.  याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी संकेत दिले आहेत. 



सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती जशा आहेत तशाच पुढच्या दोन ते तीन महिने राहिल्या तर इंधनाच्या दरात घट होऊ शकते. सरकारचा तेल आयात धोरणात मोठा बदल करण्याचे हे संकेत आहेत. 

याअंतर्गत भारताने, कच्च्या तेलाचे पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ केली आहे.आधी २७ देशातून कच्चे तेल आयात करत होते. आता ४० देशांमधून निर्यात केली जाईल. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अजूनच मजबूत होईल, असं सांगण्यात येत आहे. 

सध्या जागतिक पातळीवर दबाव असतानाही भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचे स्वातंत्र्य आहे. याचा फायदा ग्राहकांना होण्याची शक्यता आहे.

हरदीप सिंग यांनी काय सांगितले?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी सांगितले की, पुढील दोन-तीन महिने कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्या तर भारतात इंधनाच्या किंमती कमी करण्यास वाव आहे. भारत वेगवेगळ्या ठिकाणांवरुन तेलाची आयात करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तेल पुरवठा अधिक होईल. परिणामी इंधनाच्या किंमती कमी होतील, असं त्यांनी सांगितले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group