'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता ; वाचा
'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता ; वाचा
img
दैनिक भ्रमर
आज शेतकऱ्यांच्या योजनेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. याबाबत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील एका कार्यक्रमात करु शकतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत. परंतु या योजनेत काही शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीयेत. 

एका कुटुंबातील एकच शेतकरी 
पीएम किसान योजनेत फक्त एका कुटुंबातील एकच शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतो. याचसोबत योजनेचे अनेक निकष आहेत.  याचसोबत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य 
पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहेत. याचसोबत शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. जर रजिस्ट्रेशनमध्ये काही कागदपत्रांमध्ये अडचणी असतील तर तुम्हाला पैसे येण्यास अडचणी येतील.

जर बँक अकाउंट किंवा नावात काही माहिती अर्धवट असेल तर अशा परिस्थितीत पैसे ट्रान्सफर करता येणार नाही. त्यामुळे याबाबतची माहिती आधी मिळवा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group