मराठी-हिंदी भाषेचा वाद महाराष्ट्रात सुरु झाल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल आणि राज-उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आज त्यांनी जाहीर सभेत खासदार दुबे यांना चांगलच झोडपून काढलं.
राज ठाकरे म्हणाले, तो भाजपचा खासदार काय म्हणाला होता, पटक पटक के मारेंगे. मी त्याला सांगतो मुंबईत तर येऊन दाखव. तुला मुंबईच्या समुद्रात 'डुबे डुबे' के मारेंगे.