सैयारा या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते मोठ्या प्रमाणात वाट बघत होते. अखेर अहान पांडे आणि अनीत पड्डा स्टारर डेब्यू चित्रपट 'सैयारा' १८ जुलैला रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.'सैयारा'ने पहिल्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई केली. चित्रपटाने अक्षय कुमार, आमिर खान, सनी देओल सर्वांना मागे टाकले आहे.
‘सैयारा’ हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा डेब्यू चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे. चित्रपट समीक्षकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अहान पांडेची बहिण अनन्या पांडेचा डेब्यू चित्रपट 'स्टुडेंट ऑफ द ईयर २' ने पहिल्या दिवशी १२.०६ कोटी रुपये कमावले होते. जान्हवी कपूरच्या 'धडक'ने ८.७१ कोटी रुपये, खुशी कपूरच्या 'लवयापा'ने १.१५ कोटी, राशा थडानीच्या 'आजाद'ने १.५ कोटी आणि शनाया कपूरच्या 'आंखों की गुस्ताखियां'ने पहिल्या दिवशी ३० लाख रुपयांचे कलेक्शन केलं होतं.