नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, एकनाथ शिंदेंचं सरकारही हनी ट्रॅपमुळे,  विजय वडेट्टीवारांचा दावा
नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, एकनाथ शिंदेंचं सरकारही हनी ट्रॅपमुळे, विजय वडेट्टीवारांचा दावा
img
Vaishnavi Sangale
यंदाचं पावसाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्यांनी चांगलच गाजलंय. विधानसभेतील मारामारी ते नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण.  राज्यात गेल्या आठवडाभरापासून हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. 72 आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा आहे. 

महाराष्ट्राला धोका 
महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण दस्तऐवज या हनी ट्रॅपमुळे असामाजिक तत्त्वांच्या हाती गेले आहेत. महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. ती गोष्ट आम्ही विधानसभेच्या माध्यमातून सरकारला सांगत होतो. अध्यक्षांना पेन ड्राइव्ह देत असतानाही त्यांनी तो नाकारला. ते आम्हाला जाहीरपणे दाखवता येणार नाही. कारण, अनेक कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त होतील. मुख्यमंत्री हे का लपवत आहे? महाराष्ट्राचे नुकसान का करत आहे? असा सवाल नाना पटोले यांनी  उपस्थित केला.

ना हनी आहे ना ट्रॅप
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले होते. सध्या सभागृहात हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा होतेय. पण ना हनी आहे ना ट्रॅप.  असे ते म्हणाले होते. पण आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे असल्याचा दावा केलाय. 

विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा 
विजय वडेट्टीवार म्हणाले की, हनी ट्रॅपवरून ना हनी आहे ना ट्रॅप, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे देखील आहे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे. मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती  देखील अशाच सीडीमुळे झाली, इतकं मोठं ते प्रकरण आहे. त्यात खूप मोठी माणसं आहेत. ज्या वेळेस आम्ही ते दाखवू, त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपयांचे तिकीटच लावावे लागेल. ते तिकीट लावूनच आम्हाला चित्र दाखवावे लागेल. पण, त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावे लागेल एवढा मोठा भक्कम पुरावा त्यात आहे, असा दावा त्यांनी केलाय.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group