नाशिकच्या वाट्याला बदनामी येणे हे दुर्दैवच : छगन भुजबळ
नाशिकच्या वाट्याला बदनामी येणे हे दुर्दैवच : छगन भुजबळ
img
दैनिक भ्रमर

नाशिक - दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलनीकरण करायचे असतील तर मित्र पक्षांचा सल्ला घ्यावा लागेल त्यांना विश्वासात घ्याव लागेल असे सांगून राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, विधिमंडळात झालेला प्रकार हा दुःखदायक आहे. 

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय आज छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भामध्ये सध्या तरी कोणता विचार नाही हे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे पण त्यांनी जर तसं करावयाचा असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेते नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय आणि केलेले वक्तव्य हे योग्यच आहे कारण आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये तीन पक्षांचे सरकार आहे.

त्यामुळे मित्र पक्षांना विचारात घेऊन त्यांचा सल्ला घेऊन सुनील तटकरे योग्य ती पाऊल उचलतील आणि तेच करावे लागेल त्यांच्या विचाराशी सहमत असल्याचे बोलताना स्पष्ट करून छगन भुजबळ म्हणाले की सध्या तरी काय घडत आहे काय घडत नाही या सर्व बाबींचे पडताळणी करावी लागेल आणि त्यावरच प्रतिक्रिया देऊ असे ते म्हणाले. 

नासिक मध्ये सुरू असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली असेलच आणि त्यानंतरच त्यांनी याबाबत वक्तव्य दिला आहे त्यामुळे मी जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणी खुलासा केलेला आहे असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले

नासिक मध्ये फार मोठे दुर्दैव आहे कारण नाशिकचं नाव कधी खड्ड्यांवरून खराब होतं तर सातत्याने होत असलेल्या खुनामुळे नासिकला बदनामी मिळते तर कधी हनी ट्रॅप सारख्या प्रकरणांमध्ये नाशिकचे नाव येतं.

कधी नाशिक मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते हे सर्व दुर्दैव नाशिकवासी यांना मिळाला आहे याचा खेद वाटतो पण असा काय करणार कारण आलं आहे ते समोर सहन करावंच लागेल असा टोला देऊन भुजबळ यांनी नाशिकच्या होणाऱ्या बदनामी बाबत आपली नाराजी देखील व्यक्त केली.

दरम्यान नाशक मधील विमानतळ विस्तारीकरणा संदर्भामध्ये केंद्रीय उडान्न वाहतूक मंत्रालयाला पत्र दिलेले आहे. यापूर्वी या मंत्रालयाकडून सुमारे पावणे चारशे कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत. पण अजूनही जागा आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता या विमानतळाचा विस्तार होणे गरजेचे असल्याने त्या दृष्टिकोनातून पत्र दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group