रशियामध्ये AN-24 ट्विन टर्बोप्रॉप पॅसेंजर विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. या विमानात क्रू मेंबर्ससह सुमारे 50 लोक होते. यापूर्वी असे वृत्त होते की या विमानाचा एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला होता. परंतु आता हे विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुर्घटना चीन सीमेजवळील अमूर प्रदेशात घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान ब्लागोवेश्चेन्स्क ते टिंडा या सुमारे 570 किलोमीटर अंतरावर उड्डाण करत होते. विमानात सहा क्रू मेंबर्ससह सुमारे 50 लोक होते. यादरम्यान त्याचा एटीसीशी संपर्क तुटला.
आपत्कालीन सेवांनी सांगितले की विमान त्याच्या गंतव्यस्थानाच्या काही किलोमीटर आधी रडारवरून गायब झाले. शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. हा परिसर प्रामुख्याने बोरियल जंगलाने वेढलेला आहे, ज्यामुळे बचाव कार्य कठीण होत आहे.
प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार, AN-24 प्रवासी विमानात पाच मुलांसह ४३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते . विमानाचा संपर्क तुटल्यानंतर, त्वरित बचाव आणि शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्याचा मलबा सापडला.