पुन्हा एकदा संकटाची चाहूल, तिन ग्रहांचा 'या' 5 राशींवर परिणाम होणार
पुन्हा एकदा संकटाची चाहूल, तिन ग्रहांचा 'या' 5 राशींवर परिणाम होणार
img
वैष्णवी सांगळे
ज्योतिष शास्त्रानुसार 28 जुलै 2025 रोजी षडाष्टक योग निर्माण होणार आहे. यावेळी मंगळ ग्रह संक्रमण करुन कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर, कुंभ राशीत राहू विराजमान आहे. यामुळे मंगळ-राहूमध्ये हा योग निर्माण होणार आहे. हा योग 13 सप्टेंबरपर्यंत असेल. त्याचबरोबर या काळात शनीसुद्धा वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रहांचा 5 राशींवर परिणाम होणार आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या सहाव्या आणि आठव्या चरणात असतात तेव्हा षडाष्टक नावाचा योग जुळून येतो. ज्योतिष शास्त्रात हा योग फार अशुभ मानला गेला आहे. या काळात अनेक अशुभ घटना घडतात.

मिथुन रास - मिथुन राशीसाठी योग फार नुकसानकारक ठरणार आहे. या काळात तुमच्यात अनेक वादविवाद होऊ शकतात. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. धनहानी देखील होऊ शकते. 

तूळ रास  - षडाष्टक योगामुळे तूळ राशीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या खर्चात विनाकारण वाढ होईल. तसेच, तुम्हाला अनेक आजारही उद्भवू शकतात. 

धनु रास - धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ-राहूचा षडाष्टक योग फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या नोकरी-व्यवसायात अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या मेहनतीचं फार कमी फळ तुम्हाला मिळेल. 

मीन रास - मंगळ-राहूचा षडाष्टक योग मीन राशीसाठी फार कठीण काळ ठरु शकतो. य़ा काळात तुमचे पार्टनरबरोबर वादविवाद होतील. तसेच, तुमच्या कामात तुमचं मन रमणार नाही. तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

मकर रास  - कर राशीच्या लोकांनी या काळात दूरचा प्रवास करु नये. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्यावी. कोणतीही महत्त्वाची कामे तुम्ही या काळात हाती घेऊ नका. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 
mangal | ,rahu | ketu |
इतर बातम्या
Join Whatsapp Group