थोडक्यात वाचला जीव ! रोमँटिक डेट बनली आयुष्यातील सर्वात भयानक रात्र, नेमकं काय घडलं ?
थोडक्यात वाचला जीव ! रोमँटिक डेट बनली आयुष्यातील सर्वात भयानक रात्र, नेमकं काय घडलं ?
img
Vaishnavi Sangale
सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ रोमँटिक, कॉमेडी, अपघात असे अनेक चित्त थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर सध्या असाच एक रक्त गोठवणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका जोडप्याची रोमँटिक डेट त्यांच्या आयुष्यातील भयानक रात्र ठरली आहे. ज्यामध्ये त्यांचा जीव ठोडक्यात वाचला आहे. 

ही घटना प्युर्टो रिको येथील सांगितली जात आहे, सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर @mr_campesin या अकाऊंटवरून 15 जुलै रोजी हा व्हिडीओ शेअर केला आहे.  जिथे एक जोडपे रात्रीच्या अंधारात बोट घेऊन रोमँटिक डेटचा आनंद घेत होते. वातावरण अगदी शांत होते आणि मात्र अंधार होता. तेवढ्यात मुलीला नदीत काहीतरी दिसले आणि ती एकदम घाबरली, काही सेकंदांसाठी तर ती जणू सदम्यात गेली.

व्हिडीओमध्ये दिसतंय की बोटीपासून फक्त एक इंच अंतरावर एक विशाल मगर मृत्यू बनून उभी होती. पण हा भयंकर प्राणी इतक्या शांतपणे बोटीच्या बाजूने निघून गेला, जणू तो डायटिंगवर होता. त्यामुळे ही रोमँटिक डेट त्यांच्या आयुष्यातील भयानक रात्र बनली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group