जर तुम्ही कमी प्रकाशात व्हॉट्सअपचा कॅमेऱ्याने नाखूश असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. व्हॉट्सअप आपल्या युजर्सचा एक्सपीरियन्स आणखी चांगला करण्यासाठी नवीन मोड घेऊन येत आहे. या फिचरचे नाव नाईट मोड असे आहे. या नाईट मोडने व्हॉट्सअप कॅमेऱ्याने कमी प्रकाशात चांगला फोटो काढता येणार आहे.
या फिचरला सध्या Android व्हर्जन 2.25.22.2 च्या बीटा टेस्टर्ससाठी सुरु करण्यात आले आहेत. या फिचर्सचे काय होणार आहेत फायदे आणि तुम्ही याचा कसा वापर करणार या संदर्भात खाली पाहूयात…
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार काही बीटा युजर्सला WhatsApp च्या या इनबिल्ट कॅमेऱ्यांत चंद्रा सारखा आयकॉन दिसेल, जेव्हा तुन्ही या आयकॉनवर क्लिक कराल आणि लो लाईट्समध्ये फोटो क्लिक कराल तर WhatsApp चे सॉफ्टवेअर स्वत:च फोटोची क्वालिटी सुधारेल.
या फिचरचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही कमी प्रकाशात फोटो क्लिक कराल तर हा एक्सपोझरला ऑटोमेटीक एडजस्ट करेल. याच बरोबर फोटोत दिसणाऱ्या नॉईजला देखील कमी करेल. शॅडो आणि डार्क एरियात देखील जास्त डिटेल्स दिसतील. या मोडच्या ऑन झाल्यानंतर एक्सटर्नल फ्लॅश वा लाईटची गरज पडणार नाही. लक्षात घ्या या फिचरला तुम्ही ऑन कराल तेव्हाच ते काम करेल.
गेल्या काही दिवसात WhatsApp ने आपल्या कॅमेऱ्यात नवीन फिल्टर समाविष्ठ केले होते. ज्याद्वारे आता फोटो वा व्हिडीओ क्लिक करण्यापूर्वी रिअल -टाईम इफेक्ट्स लावू शकता. आधी हे इफेक्ट्स केवळ व्हिडीओ कॉलमध्येच मिळत होते.
आता WhatsApp लवकरच एक असे फिचर आणणार आहे ज्यात युजर इस्टाग्राम वा फेसबुकवरुन डायरेक्ट आपले प्रोफाईल फोटो इम्पोर्ट करू शकणार आहे.
सध्या WhatsApp वर फोटो बदलण्यासाठी कॅमेरा, गॅलरी, अवतार वा एआय जनरेटेड इमेजचे ऑप्शन मिळू शकणार आहे. नवे फिचर आल्यानंतर Instagram आणि Facebook चे ऑप्शन देखील जोडले जाणार आहे.