मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इंदौरच्या गांधीनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील हिंगोनिया खुर्द गावात वास्तव्यास असणाऱ्या तरुणाचे कुटुंबीय लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. मुकेश मराठा नावाच्या व्यक्तीने मध्यस्थी करत एका पाच वर्षाच्या मुलाच्या आईचं अविवाहित आणि ब्राह्मण समाजाची असल्याचं सांगत एका हिंदू तरुणाशी लग्न लावण्यात आलं.
मुलगी जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या तोंडातून 'या अल्लाह', 'अल्लाह की कसम' सारखे शब्द ऐकल्यानंतर कुटुंबीयांना संशय आला. तिची चौकशी केली असता निकिताने तिचं नाव नाजिया असं सांगितलं. पीडित तरुणाने सांगितलं की, यानंतर, एके दिवशी जसवंतला शाहनवाज उर्फ शानू नावाच्या व्यक्तीचा फोन आला, त्याने सांगितले की तो नाजियाचा पती आहे आणि त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. हे ऐकून कुटुंब स्तब्ध झालं.
यानंतर, नाजिया अचानक घरातून सर्व सामान घेऊन पळून गेली. जेव्हा त्या तरुणाला नाजियाच्या कुटुंबाची माहिती मिळाली तेव्हा त्याला कळले की ती नैता मुंडला येथे भाड्याच्या घरात राहू लागली आहे. नाजियाचे मूल त्याच्याकडे आहे. जेव्हा तरुणाने नाझियाच्या आईशी बोलले तेव्हा तिनेही त्याला तिला विसरून जाण्यास सांगून धमकावण्यास सुरुवात केली. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर तरुण परशुराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयात पोहोचला. तरुणाच्या तक्रारीच्या आधारे तपास केला जात आहे.