नाशिक (प्रतिनिधी) :- अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी विवाह केल्यानंतर तिच्याशी संबंध ठेवून मुलाला जन्म देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित फिर्यादी ही अल्पवयीन आहे. दरम्यान, आरोपी नीलेश अशोक मगरे (वय 21, रा. सार्वजनिक शौचालयामागे, रचना विद्यालयाच्या मागे, शरणपूर रोड, नाशिक) पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्याशी विवाह केला. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले. त्यातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला. हा प्रकार दि. 1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत शरणपूर येथे घडला.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी नीलेश मगरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.