IAS तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; 19 वर्षात 23 वेळा बदली, आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
IAS तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; 19 वर्षात 23 वेळा बदली, आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
img
वैष्णवी सांगळे
सततच्या बदली सत्रामुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचे दिसत होते. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतुने मुंढे जी पावले उचलतात, तीच त्यांच्या बदल्ंयासाठी कारण ठरतात. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र सरासरी एक वर्षेच काम करताना दिसून येतात.

तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही 23 वी बदली ठरली आहे. प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचं दिसून येतंय. आता तुकाराम मुंढे यांची असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून ते आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील. तुकाराम मुंढे यांच्यासोबत इतर चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group