बँकेच्या सीसीटीव्हीत दिसले नंतर...; शिवसेनेचा नेता रहस्यमयरित्या गायब
बँकेच्या सीसीटीव्हीत दिसले नंतर...; शिवसेनेचा नेता रहस्यमयरित्या गायब
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहे. संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते अचानक रहस्यमयरित्या गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संजय पाटील नक्की कुठे गेले, कोणाकडे गेले हे समजण्यास मार्ग नाही. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईली सध्या बंद असल्याने थांगपत्ता लागण्यास अडचण येत आहेत. पोलिसांकडून पाटील यांचा कसून शोध घेतला जात आहे. संजय पाटील हे धरणगाव तालुक्यातील दोन गाव येथील रहिवासी असून ते सध्या धुळे येथे वास्तव्यास होते. 

काही दिवसांपूर्वी गावाकडे जात असल्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे जळगाव शहर पोलीस ठाण्यात संजय पाटील यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी संजय पाटील यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

शोध घेत असताना संजय पाटील हे जळगाव शहरातील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. एटीएममधून पैसे काढल्यानंतर संजय पाटील हे कोर्ट चौकाकडे जाताना दिसले. त्यानंतर ते जळगाव रेल्वे स्थानकावर शेवटचे दिसले. संजय पाटील हे अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसताना दिसल्याची माहिती असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र संजय पाटील यांचे दोन्ही मोबाइल बंद असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

कोण आहेत संजय लोटन पाटील ?
संजय लोटन पाटील जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख शिंदे गटाचे प्रमुख असून गुलाबराव पाटील यांचे निकटर्तीय असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली . हे मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी आहेत. मात्र सध्या ते धुळे येथे वास्तव्याला होते.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group