प्रसिद्ध उद्योगपतींकडून 'लालबागच्या राजा'ला भरभरून दान; पिशवी भरून ५०० च्या नोटांची बंडलं आणली
प्रसिद्ध उद्योगपतींकडून 'लालबागच्या राजा'ला भरभरून दान; पिशवी भरून ५०० च्या नोटांची बंडलं आणली
img
वैष्णवी सांगळे
‘लालबागचा राजा’ हे गणेशोत्सवाचे सर्वात मोठे आणि श्रद्धेचे केंद्र मानले जाते. महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. राजकारण, मनोरंजन,  उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर दरवर्षी येथे हजेरी लावतात. यंदाही हजारो भाविक तासन्‌तास रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. 

प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी नुकतेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी, त्यांनी बाप्पाच्या चरणी मोठे दान अर्पण केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आणि सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरू झाली आहे. या दानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून 'लालबागचा राजा' मंडळाला देशातून आणि परदेशातून मोठे दान मिळत आहे. मात्र, यावर्षी गौतम सिंघानिया यांनी केलेल्या दानाची पद्धत आणि रक्कम चर्चेचा विषय बनली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सिंघानिया यांनी ५०० रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल दानपेटीत अर्पण केले. 

कार्यकर्त्यांनी एकामागून एक बंडल बाहेर काढून दानपेटीत टाकले. यामुळे, त्यांनी दिलेल्या देणगीची रक्कम लक्षणीय आणि मोठी असल्याचे स्पष्ट होते. मात्र, ही नेमकी रक्कम किती होती याबाबत मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group