अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले 'बागी 4' आणि 'द बंगाल फाइल्स' हे दोन्ही चित्रपट ५ सप्टेंबरला रिलीज झाले आहेत. तर 'परम सुंदरी' हा चित्रपट २९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ऍक्शन, कॉमेडी, सस्पेंस, थ्रिलर असे विविध फिचर या चित्रपटांमध्ये पहायला मिळतात.
'परम सुंदरी'
मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे.चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन संस्कृतींचे सुंदर दर्शन पाहायला मिळते. या चित्रपटातील गाणी तुफान हिट झाली आहेत
'द बंगाल फाइल्स'
‘द काश्मीर फाइल्स’नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री पल्लवी जोशीने केली आहे. तसेच विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शन केले आहे.'द बंगाल फाइल्स' चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, पुनित इस्सर हे कलाकार पाहायला मिळत आहेत.
'बागी 4'
'बागी 4' ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात टायगर श्रॉफसोबत सोनम बाजवा,संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत. 'बागी 4' ए. हर्ष दिग्दर्शित चित्रपट आहे. बागी फ्रँचायझीचा 'बागी 4' सीक्वल आहे.
या तिन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.
'बागी 4' बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला दिवस - 12 कोटी रुपये
दुसरा दिवस - 9 कोटी रुपये
तिसरा दिवस - 10.25 कोटी रुपये
चौथा दिवस - 4.25 कोटी रुपये
एकूण - 35.50 कोटी रुपये
'द बंगाल फाइल्स' बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला दिवस - 1.75 कोटी रुपये
दुसरा दिवस - 2.25 कोटी रुपये
तिसरा दिवस - 2.75 कोटी रुपये
चौथा दिवस - 1.10 कोटी रुपये
एकूण - 7.85 कोटी रुपये
'परम सुंदरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन
'परम सुंदरी' चित्रपट लवकरच ५० कोटींचा टप्पा गाठणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'परम सुंदरी' चित्रपटाने ११ दिवसांत ४६.७५ कोटी रुपयांच्या कमाई केली आहे. 'परम सुंदरी' ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यापासून फक्त ४ कोटी रुपये दूर आहे.