‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालबद्दल सोशल मीडियावर एक अशी अफवा पसरली, जी वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. काजलचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका अपघातात काजल गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर होतेय.
अभिनेत्री काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. काजल अग्रवालचे निधन झाले असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली. काजलचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. आता या अफवा खोट्या असल्याचे स्वतः अभिनेत्रीने सांगितले आहे.
सोमवारी रात्री काजल अग्रवालचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी पसरली. मात्र आता काजल अग्रवालने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून खोट्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तिने पोस्टमध्ये तिच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.तसेच ती सुरक्षित असल्याचे सांगितले. काजल अग्रवाल पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली,
"‘मला काही निराधार बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत. ज्यात असा दावा केला जातोय की माझा अपघात झाला (आणि त्यात मी माझे प्राण गमावले). प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे सर्व खूपच मजेशीर आहे, कारण ते पूर्णपणे खोटं आहे. देवाच्या कृपेनं, मी तुम्हा सर्वांना खात्री देऊ इच्छिते की मी पूर्णपणे ठीक आहे, सुरक्षित आहे खूप चांगलं काम करतेय. मी तुम्हाला विनंती करते की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या व्हायरल करू नका. आपण आपल्या सकारात्मक ऊर्जेवर आणि सत्यावर लक्ष केंद्रीत करुयात’,."